नवाजुद्दीनच्या ‘फोटोग्राफ’चा ट्रेलर रिलीज

nawazuddin-siddiqui
मुंबईच्या रस्त्यांवर खुलणारी प्रेमकथा आणि त्यामध्ये सूत्रधाराची भूमिका निभावणारा एक फोटोग्राफ असे एकंदर कथानक असलेल्या रितेश बत्रा दिग्दर्शित आणि नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा अभिनीत फोटोग्राप या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून मुंबईच्या रस्त्यांवर विशेषत: पर्यटकांचे फोटो काढणारे फोटोग्राफर अर्थात छायाचित्रकार, त्यांचे आयुष्य आणि त्यात फुलणारी एक आगळीवेगळी दुरावा असूनही प्रेमाची, अस्तित्वाची अनुभूती असल्याची झलक आपल्याला पाहायला मिळते. फोटोग्राफ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने जेथे सर्वांचीच दाद मिळवल्यामुळे आता बॉलिवूड चित्रपटांच्या स्पर्धेत नव्या धाटणीचा हा फोटोग्राफ चाहत्यांची मनं जिंकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१५ मार्च २०१९ला अॅमेझॉन स्टुडिओज सादर करत असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्रा हिसुद्धा एका आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहे. तर, यावेळीही नवाजुद्दीन हा त्याच्या अभिनयाची छाप पाडत आहे.

Leave a Comment