नऊ वर्षे पत्नीसोबत राहिल्याने पतीच्या समोर अचानक उलगडले असे सत्य

m

पती-पत्नीचे नाते हे अत्यंत प्रेमाचे, आपुलकीचे, विश्वासाचे मानले जाते. पती-पत्नीने परस्परांच्या सहवासात काही वर्षे घालविली की एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभाव, एकमेकांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक घटना, चांगले वाईट प्रसंग यांची ओळख आपोआपच होऊ लागते. अमेरिकेचे निवासी असणारे एक दाम्पत्य मात्र या गोष्टीला अपवाद ठरले आहे. अमेरिकेतील मिसूरीचा निवासी असलेल्या केन चेरी नामक इसमाची भेट सुसन बोजिच नामक महिलेशी २००४ साली झाली. ओळख वाढली, ओळखीचे रूपांतर चांगल्या मैत्रीमध्ये झाले, आणि काही काळाने मैत्री प्रेमात परिवर्तित झाली. २००५ साली केन आणि सुसन विवाहबद्ध झाले.

लग्नानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरु झाला. पाहता पाहता नऊ वर्षांचा काळ सरला. २०१४ साली मात्र अचानक असे काही घडले, की त्याबद्दल माहिती झाल्यानंतर केनच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. केनला माहिती झालेले रहस्य इतके गंभीर होते, की त्यापायी केनने सुसनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. केनच्या वकिलांनी केनच्या आग्रहाखातर सुसनविषयी गुप्तपणे माहिती गोळा केली असता, त्यातून सुसनने केनशी विवाह करण्यापूर्वी चार विवाह केले असून, केन हा सुसनचा पाचवा पती असल्याची धक्कादायक माहिती उघडकीला आली. सुसन आधीपासूनच विवाहित असल्याने केन व सुसनचा विवाह ‘null and void’ ठरला होता, त्या मुळे कायद्याच्या दृष्टीने या विवाहाला मान्यता नव्हती.

सुसन बद्दलची ही धक्कादायक माहिती उघडकीला आल्यानंतर केनने सुसन पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोघे वेगळे झाले ही आहेत. केन आणि सुसनच्या विवाहाला मुळातच कायदेशीर मान्यता मिळाली नसल्याने घटस्फोट घेण्याच्या कायदेशीर कारवाईतून केन आपोआपच मोकळा झाला असला, तरी सुसनसोबत नऊ वर्षे राहूनही तिने केलेली फसवणूक आपण कधीच विसरू शकत नसल्याचे केन म्हणतो.

Leave a Comment