नवी दिल्ली येथे आता बनत आहे गाईंंकरिता ‘पेइंग गेस्ट हॉस्टेल’

cows

शहर लहान असो, वा मोठे, वाहनांच्या गर्दीने वाहणारे आणि माणसांच्या गजबजाटाने भरलेले रस्ते कोणत्याच शहराला अपवाद नाहीत. या सर्व भाऊगर्दीमध्ये रस्त्याने हिंडणारी बेवारशी जनावरे भारतातील बहुतेक प्रत्येक शहरात, गावात आढळतात. विशेषतः गायी म्हाताऱ्या होऊन दुध देईनाशा झाल्या की त्यांना सोडून देण्यात आल्याचे ही अनेकदा आढळून येते. अशा गाई वाहत्या रस्त्यामध्ये रस्त्याच्या मध्यभागी निवांत बसलेल्या, किंवा कचऱ्याचे ढीग उपसून त्यातून काही तरी चरत असतानाचे दृश्य आपल्यासाठी नवे नाहीच. याला भारताची राजधानीही अपवाद नाही. या समस्येचे निवारण करण्यासाठी दिल्ली सरकारच्या वतीने एक नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या वतीने रस्त्यांवर भटकणाऱ्या बेवारशी गाईंसाठी आता एक हॉस्टेल सुरु करण्यात येणार असल्याचे समजते.

cows1

या हॉस्टेलमध्ये आणल्या जाणाऱ्या गाईंचे खाणे पिणे आणि त्यांचे आरोग्य यांची संपूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात येणार असून, गाईंच्या माकालाला आपल्या गाई या हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी काही ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. या हॉस्टेलमध्ये राहण्यास आलेल्या गाईंना ‘मायक्रोचिप’ लावली जाणार असून, त्याद्वारे या गाईंवर देखरेख करणे शक्य होणार आहे. २७२ वॉर्ड्स असलेल्या या हॉस्टेलमध्ये गाईंसाठी वैद्यकीय उपचारांची देखील सोय करण्यात येणार आहे.

cows2

गाईंसाठी बनविले जाणार असलेले हे हॉस्टेल अठरा एकर जमिनीवर बनविले जाणार आहे. याच जमिनीवर एक वृद्धाश्रमही उभारण्यात येत आहे. या वृद्धाश्रामामध्ये राहण्यास आलेले वृद्ध, हॉस्टेलमधील गाईंची देखभाल करण्याच्या कामी मदत करणार असल्याचे समजते.

Leave a Comment