प्रॅन्कच्या नावावर काही पण?

frank
आज काल प्रॅन्क च्या नावाखाली काही बाही प्रकार करून लोकांना छळणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. अशी हि प्रॅन्क करणारी मंडळी कधी काय करतील यांचा नेम नाही. नुकताच न्यू जर्सी येथील मॅक डोनाल्डस मध्ये हा प्रकार घडला. एसीच्या गारेगारवाऱ्यात स्वादिष्ट बर्गरचा आस्वाद घेत असताना. एक माथेफिरू प्रॅन्क करणाऱ्याने एक मोठा पांढरा उंदीर तिथे सोडला आणि एकच आरडाओरडा सुरु झाली.

कुणी तरी हा व्हिडीओ शूट करून लगेच इंटरनेट वर टाकला व नेटकऱ्यांनी त्या विचित्र प्रॅन्क करणाऱ्याचा चांगलाच समाचार घेतला. काहीच वेळात व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि तब्बल अडीच लाख नेटिझन्सनी हा व्हिडीओ बघितला असून ५०,००० नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत

Leave a Comment