हि आहेत अँड्रॉइड फोन्सची ‘सिक्रेट’ भन्नाट फीचर्स

android
स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. माणसाच्या मूलभूतगरजांची व्याख्या आता अन्न, वस्त्र, निवारा आणि स्मार्टफोन अशी केली तर त्यात काही वावगे ठरणार नाही. आपण वापरात असेलेल्या स्मार्ट फोन्सची काही सिक्रेट फिचर्स जर माहित झाली तर यापेक्षा ‘ बेस्ट’ काय असेल. चला तर मग हि काही स्मार्ट आणि सिक्रेट फिचर्स ज्यांनी मोबाईल स्मार्टफोन्सचा परफॉर्मन्स अधिक स्मार्ट होईल.

आजकाल प्रत्येकालाच ज्याची त्याची पर्सनल स्पेस जपायची असते. म्हणूनच आपला मोबाइल इतर कुणी हातात घेतला आणि मेसेजेस वाचले तर अनेकांना आवडत नाही. अशा कारभारी मित्रांना दूर ठेवण्याकरिता लोकेशन अँड सिक्युरिटीमध्ये जाऊन स्क्रिन पिनींगवर क्लिक करा. असे केल्यास तुम्ही पिन केलेले अँप स्क्रिनवर दिसेल.

प्रत्येकालाच सतत फोन लॉक अनलॉक करण्याच्या कंटाळा येतो. अशांकरिता देखील फोन्समध्ये एक स्मार्ट फिचर आहे. ट्रेस्टेड लोकेशन असे याचे नाव आहे. हे फिचर लोकेशन अँड सिक्युरिटीमध्ये असून हे फिचर ऑन केल्याने ट्रेस्टेड लोकेशनवर गेल्याने फोन आपोआप अनलॉक होतो.

मोबाइलमध्ये असलेला डेटा युझर्सना अतिशय प्रिय व महत्वाचा असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा डेटा अचानक डिलीट झालाच तर मग विचारायलाच नको. हा डेटा व माहिती बॅकअप फिचर्सच्या माध्यमाने सुरक्षित ठेवता येते. बॅटरी बॅकअप हा प्रत्येक स्मार्टफोनचा सर्वाधिक महत्वाचा भाग. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मोबाइल बॅटरी लवकरच डेड होते अशी अनेकांची तक्रार असते. फोनमधील बॅटरी या पर्यायावर क्लिक करून त्याविषयी विस्तृत माहिती घेते येते. तसेच बॅटरीची गुणवत्ता वाढवायला देखील मदत होते.

अनेकजण मोबाइल लॉक उघडण्यासाठी फिंगर प्रिंट लॉकची मदत घेतात. परंतु, एकाच हाताचा फिंगर प्रिंट लॉक असेल व तो व्यस्त असेल तर अशा वेळी दुसऱ्या हाताचा फिंगरप्रिंट लॉक देखील वापरता येऊ शकतो. याकरिता सिक्युरिटी अँड लोकेशन मध्ये जाऊन ५ फिंगर प्रिंट सुरु करता येईल.

Leave a Comment