टाटा स्काय आणि सन डायरेक्टतर्फे कॅपॅसिटी फी मागे

tata-sky
टाटा स्काय व सन डिरेक्टने एफटीए चॅनेलवरील नेटवर्क कॅपॅसिटी फी मागे घेतली आहे. ट्रायने घेतलेल्या निर्णया अंतर्गत हि माहिती समोर आली आहे. तसेच ट्रायच्या नवीन नियमानुसार सर्वच डीटीएच ग्राहकांना त्यांच्या जुन्या प्लॅन्सचे लवकरच नूतनीकरण करावे लागणार आहे. तर १३०रुपयात सर्व एफटीए चॅनल्सच्या सेवा ग्राहकांना पुरविण्याच्या सूचना डीटीएच ऑपरेटर्सना करण्यात आल्या आहे.

तसेच एका अहवालानुसार टाटा स्काय व सन डिरेक्टने त्यांच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त नेटवर्क फी काही अंशी कमी केली आहे. नवीन नियमानुसार आता डीटीएच ऑपरेटर्सना त्यांची मिळकत दोन भागात विभागाता येणार आहे. यातील एक कन्टेन्ट चार्ज तर एक चॅनेल्सवरील कॅपॅसिटी फी असेल. सन डायरेक्टतर्फे सर्व ३३० एफटीए चॅनेल्सचे भाडे १३० रुपये एवढेच ठेवण्यात आले असून सन डायरेक्टच्या ग्राहकांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. अतिरिक्त माहितीसाठी चॅनेल्सच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येईल.

Leave a Comment