
फोटो शूट करायला सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जायला कुणाला आवडणार नाही. नेहमीच हटके ठिकाणी जाऊन फोटोशूट करायचा अट्टाहास अनेकांचा असतो. मॉडेल मिशेल हिला असाच वगेळेपण करणे चांगलाच महागात पडला. मिशेलचे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी चाहते असून तिचे फोटो कायमच सर्वांना आवडत असतात.
करायला गेले एक आणि झाले भलतेच
मिशेलने यावेळी ब्रह्मास येथील ‘ पिग आइसलँड’ येथे फोटोशूट करायचे ठरविले. कॅमेरा आणि बाकी सर्व घाट घातल्यानंतर मिशेल कॅमेऱ्यासमोर पोझ देत असताना डुकराने धावत येऊन मिशेलचा चावा घेतला आणि फोटोशूटचे पूणर्पणे वाटोळे झाले असताना देखील मिशेलने मात्र हा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केला. व्हिडीओला तब्बल ५.२ मिलिअन नेटिझन्सनी बघितला व त्यावर कंमेंट्स देखील केल्या. करायला गेले एक झाले मात्र वेगळेच याचा प्रत्यय त्यादिवशी मिशेलला नक्कीच आला असणार एवढे मात्र नक्की.
