शत्रूने मोठी चूक केलीय, किंमत मोजावी लागेल- मोदी

pulvama
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावर दहशतवादी हल्ला होऊन ४० जवान शहीद झाल्याच्या प्रकारची मोदी सरकारने गंभीर नोंद घेतली असून पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल आणि अन्य चार मंत्र्यांशी ५० मिनिटे खास बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर मोदीनि जनतेसमोर रॅलीत बोलताना शत्रूने मोठी चूक केली आहे, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असे वक्तव्य केले आहे.

मोदी म्हणाले, आम्ही सेनेला पूर्ण मोकळीक दिली आहे. त्यांना हवे तेव्हा, हवे त्या ठिकाणी आणि हव्या त्या पद्धतीने ते पुढची कारवाई करू शकतात. सरकार त्याच्या पूर्ण पाठीशी आहे. शहीद जवानांची पार्थिव दिल्ली विमानतळावर आणली गेली तेव्हा मोदींनी त्यांना सन्मान देऊन प्रदक्षिणा घातली. मोदी म्हणाले, आम्ही देशावासियांना असा विश्वास देऊ इच्छितो, या हल्ल्यामागे जी ताकद, गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगावी लागेल. जे आमच्यावर टीका करत आहेत त्यांच्याही भावनांचा आम्ही आदर करतो. मात्र ही वेळ सर्व देशवासीयांनी एकत्र येऊन एकाच सुरात उत्तर देण्याची आहे. या घटनेचे राजकीय भांडवल केले जाऊ नये.

आपण ही लढाई जिंकण्यासाठी लढतो आहोत असे मोदी म्हणाले त्याचवेळी हल्ल्यानंतर १९ तासांनी सीआरपीएफ ने ट्विटरवरून आम्ही हा हल्ला विसरणार नाही, आणि माफ करणर नाही. शहीद जवानांना सॅल्युट करतानाचा आम्ही याचा बदला घेणार असे ट्विट केले आहे.

Leave a Comment