तुम्ही पाहिला आहे विल स्मिथ जिनी अवतार

will-smith
आपल्या अवलिया भूमिकांमुळे हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेला विल स्मिथचा असाच अवलिया अंदाज त्याच्या आगामी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विल स्मिथ सध्याच्या घडीला त्याच्या आगामी अलाद्दीन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे काही पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये जिनीच्या अवतारात दिसत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला लगेच ट्रोल केले.

या चित्रपटाची निर्मिती डिज्नीने केली असून या चित्रपटात विल स्मिथसोबत मेना मसौद आणि नाओमी स्कॉट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर याचे दिग्दर्शन गाए रिची याने केले आहे. हा चित्रपट येत्या 24 मे राजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment