तुषार कपूरसोबत वेबसिरीजमध्ये झळकणार मल्लिका शेरावत

malika-sherawat
अभिनेत्री मल्लिका शेरावत आपल्या मादक अदांसह मर्डर या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. पण या चित्रपटानंतर तिला म्हणावे तसे काम मिळाले नाही आणि त्यानंतर बॉलीवूडपासून दुरावली गेली. पण आता तिच मल्लिका लवकरच एका वेबसिरीजच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द मल्लिका शेरावतनेच आपल्या इंस्टाग्रामवर वेबसिरीजचे काही शुटिंगचे फोटो शेअर करुन दिली आहे.

या वेबसिरीजमध्ये मल्लिका शेरावतसोबत तुषार कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. ही वेबसिरीज हॉरर कॉमेडी असून यात ती एका वेगळ्या अंदाजात आपल्या समोर येणार आहे. गोलमाल सिरीजचे लेखक फरहाद सामजी या वेबसिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.

2003 साली ख्वाहिश या चित्रपटाद्वारे मल्लिकाने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती, पण तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती 2004 साली प्रदर्शित झालेल्या मर्डर या चित्रपटाने. मल्लिकाने 2005मध्ये जॅकी चॅनसोबत द मिथमध्ये काम केले. त्यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेला गुरू चित्रपटातील मैया मैया गाण्यातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर वेलकम चित्रपटात ती दिसली होती.

Leave a Comment