चंद्राबाबूंच्या 1 दिवसाच्या उपोषणावर तब्बल 10 कोटींची उधळपट्टी

chandrababu-naidu
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषण केले होते. पण उपोषणावर सरकारचे पैस खर्च झाल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या तिजोरीतून या उपोषणावर तब्बल 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अर्थ खात्याने आदेश काढून या उपोषणाच्या तयारीच्या खर्चाला मंजूरी दिली होती. या उपोषणासाठी श्रीकाकूलम आणि अनंतरपूर येथून 20 डब्ब्यांच्या विशेष दोन ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. तर राजधानी दिल्लीत उपोषण कर्त्यांसाठी अकराशे रूम्स बुक करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या स्वागतावरही वारेमाप खर्च करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

चंद्राबाबू आंध्र भवनमध्ये सोमवारी सकाळपासून उपोषणाला बसले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनऊला रवाना होण्या आधी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. फारुख अब्दुल्ला, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनीही चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला होतो.

तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे सभा घेऊन चंद्राबाबूंवर निशाणा साधला होता. चंद्राबाबू हे राज्यांच्या नाही तर आपला मुलगा लोकेशच्या भल्यासाठी काम करत असल्याची टीका त्यांनी केली होती. तर चंद्राबाबू यांनी पंतप्रधानांना धमकी देत मुलावर टीका करण्याचे बंद करा नाही तर तुमच्या पत्नीचा उल्लेख प्रचारात करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे प्रचार वयक्तिक पातळीवर गेल्याचा आरोपही होत आहे. चंद्राबाबू एनडीएतूनराज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुनच बाहेर पडले होते. तर असा दर्जा देणे घटनात्मदृष्ट्या शक्य नसल्याचा केंद्र सरकारचा युक्तिवाद आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Leave a Comment