तुम्ही पाहिले आहे ‘टोटल धमाल’चे मराठी स्पूफ

total-dhaman
काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण आणि त्याच्या सोबत असलेल्या दिग्गज स्टारकास्टच्या टोटल धमाल चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. जेवढी धमाल मराठी ट्रेलर पाहताना आली नसेल त्याच्या दुप्पट धमाल या चित्रपटाच्या ट्रेलरचे मराठी स्पूफ (प्रहसन) पाहताना येणार आहे. सोशल मीडियावर ‘चितळेंची बाकरवाडी’ घेऊन सुरु झालेले टोटल धमालच्या ट्रेलरचे मराठी भाषेतील विडंबन धमाल आणत आहे.

या स्पूफची व्हिडिओ लिंक ट्विटरवर अभिनेता रितेश देशमुखने शेअर केली आहे. रितेशने त्याखाली ‘अत्यंत विनोदी… नक्की पहा’ असे कॅप्शन दिले आहे. मूळ ट्रेलरचे मराठी भाषेत आणखी विनोदी पद्धतीने डबिंग करण्यात आले आहे. फक्त मराठीच नाही, तर पंजाबीमध्येही या ट्रेलरचे स्पूफ करण्यात आले आहे.

बॉलिवूडमधील एके काळची प्रचंड हिट अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी तब्बल 17 वर्षांनी ‘टोटल धमाल’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे. त्याशिवाय, अजय देवगन, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, महेश मांजरेकर, जॉनी लिव्हर अशी कलाकारांची फौज या चित्रपटात झळकणार आहे.

Leave a Comment