चक्क खिशातही बसेल एवढ्या छोट्या बाळाला दिला एक महिलेने जन्म

baby
नॉटिंघमशायर – चक्क खिशात बसेल एवढ्या छोट्या बाळाला इंग्लंडच्या नॉटींघमशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे बाळ चक्क तुमच्या तळहातावर देखील निवांत झापू शकेल. त्यामुळे हे बाळ पाहून फक्त सामान्य लोकच नव्हे, तर डॉक्टर सुद्धा हैराण झाले आहेत. आपल्या गर्भधारणेच्या 26 व्या आठवड्यात या बाळाला महिलेने जन्म दिला आहे.
baby2
त्या महिलेचे नाव हाना रोस (25) असे असून तिला आपल्या गर्भधारणेच्या दरम्यान खूप समस्यांना सामोरे जावे लागले होते. एका आजारामुळे बाळाला वाचवणे कठिण असल्याचे डॉक्टरांनी हाना आणि तिच्या पतीला सांगितले. तसेच हानाचे अशा परिस्थितीमध्ये आरोग्य लक्षात घेता गर्भपात करण्याचा सल्ला दिला. पण हानाने गर्भपातासाठी नकार दिला. त्याच दरम्यान तिची गर्भपात करण्याची मर्यादा निघुन गेली होती. 26व्या आठवड्यानंतर हानाची कृत्रिम प्रसुती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्यानंतर हानाने जन्म दिलेल्या बाळाचा आकार पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. ते रुग्णालयातील एका इंजेक्शनच्या आकाराचे होते. बाळ एवढे लहान होते, की त्याला कडेवर नाही तर फक्त तळहातावर घ्यावे लागत आहे. गर्भधारणा झालेली असताना हानाला सेपसिस आणि मॅनिनजायटिस नावाचे आजार होते. अशात मुलाच्या जीवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती, असे हानाची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
baby3
बाळाला जन्म दिल्यानंतर हाना सांगते की, मला व माझ्या पतीला डॉक्टर वारंवार हेच सांगत होते की ही प्रसुती झाली तर तुमचे बाळ वाचणार नाही. त्यानंतर माझी प्रसुती झाली आणि बाळाचा आकार पाहून मला मोठा धक्का बसला. त्यातच बाळा प्रसुतीनंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आणि त्याची काळजी घेत डॉक्टरांनी 10 लाखांपैकी एकच असे बाळ जीवंत राहु शकते असे सांगितले. त्यामुळे, डॉक्टरांनी सुद्धा हा एक चमत्कारच असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment