न्यायालयाच्या अवमान प्रकरणी नागेश्वर राव दोषी, न्यायालयाच्या एक कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा

nageswar-rao
नवी दिल्ली – सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाचे तपास अधिकारी ए. के. शर्मा यांची तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी दोषी असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून न्यायालयाचा नागेश्वर राव यांनी अवमान केला आहे. त्यांना यासाठी १ लाख रुपयांचा दंड आणि त्यांना न्यायालयाची वेळ संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातील कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा देण्यात येत असल्याचा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांना अवमान नोटीस बजावली होती. त्यांना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण त्यांनी त्यापूर्वीच न्यायालयाची लिखित स्वरूपात माफी मागितली होती.