धोनी-कोहलीचा ब्राव्होच्या नवीन गाण्यात जयजयकार

bravo
मैदानासोबतच आपल्या गाण्यासाठीही वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा ओळखला जातो. ब्राव्होला काही वर्षांपूर्वी आलेल्या चॅम्पियन…चॅम्पियन गाण्यामुळे डीजे ब्रोव्हो अशी नवीन ओळख मिळवून दिली. ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता एक नवे कोरे गाणे घेऊन ब्राव्हो पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

ब्राव्होने आशिया या आपल्या नवीन गाण्यामधून आशिया खंडातील क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या गाण्यात श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या संघातील प्रमुख खेळाडूंना स्थान दिले आहे. ब्राव्होने आपल्या गाण्यात भारतीय संघातील विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला जयजयकार केला आहे. सोशल मीडियावर ब्राव्होच्या या नवीन गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment