विश्वचषकात धोनीचा अनुभव कामी येईल – युवराज सिंह

combo
नवी दिल्ली – मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या संघात महेंद्रसिंह धोनीचा अनुभव कामी येईल त्यामुळेच त्याचे संघात असणे गरजेचे असल्याचे भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने म्हटले आहे. धोनी संघात असल्यास तो विराटला निर्णय घेण्यासाठी चांगली मदत करतो. धोनीच्या एकदिवसीय संघातील स्थानावरुन गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक माजी खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. युवराज सिंह यावर आपले मत देताना बोलत होता.

धोनीकडे क्रिकेटची चांगली जाण असून एक यष्टीरक्षक या नात्याने त्याला सामन्याचा अंदाज लगेच येतो. त्याचबरोबर तो एक सर्वोत्तम कर्णधार होता आणि सध्याच्या घडीला विराट कोहलीसह अनेक तरुण खेळाडूंना त्याचे मार्गदर्शन हे मोलाचे आहे. विश्वचषकासाठी धोनीचे संघात असणे याचकारणासाठी गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत धोनीला युवराजने आपला पाठींबा जाहीर केला.

धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगले पुनरागमन केले आहे. धोनी ज्या पद्धतीने आधी फलंदाजी करायचा त्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायी असते. पण कोणत्या स्थानावर धोनीने फलंदाजी करावी, हा निर्णय त्याने आणि संघ व्यवस्थापनाने घ्यायचा असल्याचे युवराजने स्पष्ट केले.

Leave a Comment