चहल तु माझ्यासाठी आणि संघासाठी प्रेरणादायक – स्मृती मंधाना

smriti-mandhana
ऑकलंड – भारतीय महिला आणि पुरुष संघ सध्या न्यूझीलंड दौ-यावर आहेत. भारतीय पुरुष संघाने एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता न्यूझीलंड विरुध्द 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या महिला आणि पुरुष संघाचा पराभव झाला आहे. आज दुसरा टी-20 सामना ऑकलंड येथे खेळवला जात आहे. याआधी चहल टीव्हीवर भारतीय महिला संघाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधानाने हजेरी लावली.

चहलने यावेळी स्मृती मंधानाला बोलावले होते. तिला प्रश्न विचारताना चहल म्हणाला, तुला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटरचा पुरस्कार नुकताच मिळाला आणि जगातील नंबर एक महिला खेळाडू बनली आहे, तर तुझी फलंदाजी ऐवढी कशी काय सुधारली?, की माझी फलंदाजी बघून तुला प्रेरणा मिळाली?


स्मृती यावर उत्तर देताना म्हणाली, की हो नक्कीच, तुझी चौथ्या सामन्यातील फलंदाजी बघून मला ऐवढी प्रेरणा मिळाली, की आता मला पण वाटते की मी ही माझ्या फलंदाजीत सुधारणा करायला हवी. यासाठी तु माझ्यासाठी आणि संघासाठी प्रेरणादायक ठरला. यावर चहल म्हणाला, तु बरोबर फलंदाज निवडला आहे. तुझी फलंदाजी सुधारण्यासाठी तु एकदम बरोबर फलंदाज निवडला आहे.

Leave a Comment