’83’ मध्ये पंकज त्रिपाठीची महत्वपूर्ण भूमिका

pankaj-tripathi
रणवीर सिंगची अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करण्याची खूप जुनी इच्छा होती. आता त्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारत असलेल्या ’83’ या चित्रपटात ‘गँग ऑफ वासेपूर’मध्ये ‘सुल्तान’च्या भूमिकेमुळे खास लक्षात राहिलेले पंकज त्रिपाठी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

पंकज या चित्रपटात १९८३ च्या विश्वचषकाच्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे मॅनेजर राहिलेल्या मान सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. रणवीर सिंग ’83’ या चित्रपटात विश्वचषक विजेत्या कर्णधार कपिल देव यांची भूमिका करीत आहे. या चित्रपटात साहिल खट्टर, तामिळ अभिनेता चिराग पाटील आणि पंजाबी अभिनेता अॅमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. कबीर खान ’83’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. रिलायन्स एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मधु मंटेना, विष्णू इंदूरी आणि कबीर खान करीत आहेत.

Leave a Comment