दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहितची विश्वविक्रमाला गवसणी

rohit-sharma
ऑकलंड : एक नवा विश्वविक्रम भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने रचला आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात रोहितने 29 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रोहितच्या या खेळीसह आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा झाल्या आहेत. यापूर्वी न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर हा विश्वविक्रम होता.

रोहितच्या या सामन्यातील अर्धशतकासह आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 2288 धावा झाल्या आहेत. गप्तीलच्या नावावर यापूर्वी 2272 धावा होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आता रोहितच्या नावावर आहेत.

Leave a Comment