आठवलेंच्या कवितेमुळे मोदींनाही हसु आवरेनासे झाले

ramdas-aathwale
नवी दिल्ली: आपल्या हटके कवितामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. नुकतीच संसदेत आठवले यांनी सादर केलेल्या कवितेमुळे तेथे उपस्थित असणा-या सा-यांनाच हसू फुटले. सोशल मीडियावर आठवले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर रामदास आठवले त्यांच्या कवितांसाठी प्रसिद्ध असून, सोशल मीडियावर त्यांच्या या कवितांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. नेटिझन्सच्या पसंतीस पडत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होतात.

प्रत्येक मंत्री आपल्या भाषणातून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला प्रतिसाद देत होते. एकामागोमाग एक भाषणे होत असल्यामुळे सभागृहातील खासदार कंटाळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसवर घणाघाती टीका केली. अनेक खासदार पेंगुळले होते. आठवले अशावेळी उभे राहिले अन् म्हणाले, राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, असे आठवले यांनी म्हणताच सभागृहात तुफान हशा पिकला. मोदींनाही आठवले यांची कविता ऐकून हसू आवरले नाही.

आठवले यांनी मोदींचे त्यांच्या कवितेतून तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांवर तोंडसुख घेतले. अनोख्या यमकासाठी आठवलेंच्या यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. आठवले यांनी अनेकदा संसदेत भाषणादरम्यान कविता सादर केल्या असून, त्या व्हायरल झाल्या आहेत.

Leave a Comment