तेजस्वी यादव यांना सरकारी बंगला खाली करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

tejaswi-yadav
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना दणका दिल्यामुळ तेजस्वी यांना आपला सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंगला विवादप्रकरणी यादव यांची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच तेजस्वी यांना ५० हजारांचा दंडही ठोठावला आहे.

तेजस्वी यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे बंगला खाली करावा लागणार आहे. यापूर्वी तेजस्वी यांच्या याचिकेला पाटणा उच्च न्यायालयानेही रद्दबातल ठरवले होते. यानंतर तेजस्वी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेजस्वी यांचा बंगला खाली करण्यासाठी बिहार पोलीस पोहोचली होती. मात्र, तेजस्वी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांचा बंगला खाली करण्यात आला नाही.

तेजस्वी यांना बिहारचे उपमुख्यमंत्री असताना पाटण्याच्या ५ देशरत्न मार्गावरील बंगला देण्यात आला होता. तेजस्वी अजूनही तेथेच राहतात. मात्र, आता उपमुख्यमंत्री सुशील मोदी आहेत. त्यामुळे बिहार सरकारने तेजस्वी यांचे घर खाली करण्याचे आदेश दिले.

Leave a Comment