ऐवढी कांड करुनही माझे नाव ‘#MeToo’मध्ये आले नाही

shatrughan-sinha
अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मी अनेक कृत्ये केली, मात्र तरीही माझे नाव ‘#MeToo’मध्ये आले नसल्याचे म्हटले आहे. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या विनाशामागेही एका महिलेचाच हात असतो, असेही त्यांनी म्हटले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी हे वक्तव्य लेखक धृव सोमानी यांचे पुस्तक ‘अ टच ऑफ एविल’च्या उद्गाटनप्रसंगी केले. त्यासोबतच ‘मी टू आंदोलनाची चेष्टा करत नसून माझ्या वक्तव्यांना सकारात्मकरित्या घ्या, असेही ते म्हणाले.

सध्याच्या घडीला बॉलीवुडमध्ये मीटूचे वादळ घोंघावत आहे आणि हे बोलण्यासाठी कोणतीही लाज वाटायला नको की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या विनाशामागे एक महिला असते. या आंदोलनात मी बघितले की यशस्वी पुरुषाच्या समस्या आणि बदनामीमागे सर्वाधिक महिला असल्याचे त्यांनी म्हटले. स्वत:ला मी अतिशय भाग्यवान समजतो की, अनेक कृत्ये करुनही माझे नाव मीटूमध्ये आले नाही. म्हणूनच माझ्या बायकोचे मी ऐकतो, काही नसूनही असे दाखवतो की, मी एक सुखी विवाहित पुरुष आहे, माझे जीवन खूप चांगले चालले असल्याचे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

Leave a Comment