माझ्या परवानगीविना मला जन्म दिला म्हणत आई-वडिलांविरोधात मुलगा न्यायालयात

facebook
मुंबई: एका मुलाने आई-वडिलांनी स्वत:च्या आनंदासाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी, माझ्या परवानगीविना मला जन्म दिला आहे, अशी अजब तक्रार केली आहे. थेट न्यायालयात जाण्याच्या तयारीत हा मुलगा आहे. या बहाद्दराचे नाव रफाएल सॅम्युअल असे आहे. स्वत:च्या फेसबुकवर रफायलने याबाबतची पोस्ट केली. मात्र त्याने ही पोस्ट काही काळानंतर डिलीट केली.

मला माझी परवानगी न घेता आई-वडिलांनी जन्म दिला, असे रफाएलचे म्हणणे आहे. 27 वर्षीय रफायल म्हणतो, माझे आई वडिलांवर प्रेम आहे, मात्र केवळ स्वत:च्या आनंदासाठी त्यांनी मला जन्मला घातले. मला स्वत:च्या स्वार्थासाठी जन्म दिला असेल, तर मी कष्ट का करावे? मी त्रास का झेलावा? अँटी नेटलिज्मवर रफाएल सॅम्युअलने दुसरी एक पोस्ट केली. मानवी जीवनात खूप समस्या असल्यामुळे लोकांनी मुलांना जन्म देणे बंद केले पाहिजे, अशी अँटी नेटलिज्मची विचारधारा आहे.

दरम्यान, पोस्टमध्ये रफाएलच्या आईनेही आपल्या मुलाची प्रशंसा केली पण त्याचवेळी त्याची फिरकीही घेतली. मुलाला जन्म देण्यापूर्वी मी त्याची परवानगी कशी घेऊ शकते, हे जर रफाएल न्यायालयात सिद्ध करू शकला, तर मी माझी चूक मान्य करेन, असे आईने म्हटले. दुसरीकडे मी एक सामाजिक हेतू ठेऊन ही पोस्ट केली आहे असे सॅम्युएल म्हणत आहे

Leave a Comment