प्रमोशन दरम्यान रणवीरने मारलेल्या उडीमुळे अनेक जखमी

ranvee-singh
लवकरच ‘गली बॉय’ चित्रपटातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात झाली असून या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरने दाखवलेला अतिउत्साहीपणा त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.

रणवीरने मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान स्टेजवर रॅप साँग गात असतानाच अचानक चाहत्यांवर उडी घेतली. ही गोष्ट इतकी अनपेक्षितरित्या घडली की सावध नसल्याने यावेळी काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.


रणवीरला सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे अनेकांनी ट्रोल केले आहे. आता तरी मोठा हो, असा टोलाही काही नेटकऱ्यांनी त्याला लगावला आहे. अशी अचानक उडी मारण्याची रणवीरची ही पहिली वेळ नाही. त्याने याधीही अनेकदा असा प्रकार केला आहे. सध्या हे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान ‘गली बॉय’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment