माजी पंतप्रधानांच्या भेटीला कपिल शर्मा

kapil-sharma
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विनोदी अभिनेता कपिल शर्माने भेट घेतली आणि अमृतसरच्या आठवणींना उजाळा दिला. कपिलने आपल्या ट्विटरवर मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.


कपिलने या फोटोसोबत लिहिले आहे, मनमोहन सिंग यांचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य आणि अमृतसरशी संबंधित आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभार, विशेषतः आमच्या कॉलेज आणि खाण्याबद्दल. तुमच्यासारख्या विनम्र आणि नेक राजकारण्याशी भेटीचा योग सन्मानाची गोष्ट असल्याचेही कपिलने पुढे म्हटले आहे. सध्या कपिल शर्मा पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’ चे सुत्रसंचालन करीत आहे.

Leave a Comment