एबीसीडी 3 नाही…. स्ट्रीट डान्सर आहे चित्रपटाचे नाव

street-dancer
रेमो डिसूझाचे दिग्दर्शन असणा-या एका चित्रपटात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर ही जोडी झळकणार आहे. चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती. पण त्या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. आता चित्रपटाच्या नावाचा सस्पेन्स संपला असून चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


या चित्रपटाचे ‘स्ट्रीट डान्सर’ असे नाव असणार आहे. ‘एबीसीडी’ चित्रपटाचाच तिसरा भाग हा चित्रपट असल्याने ‘एबीसीडी-३’ असे या चित्रपटाचे शीर्षक असल्याचे म्हटले जात होते. पण, आता चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. यात वरूण आणि श्रद्धाशिवाय प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर करण्यात आले होते. चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment