लॅकमे फॅशन वीकच्या रॅम्पवर सिंधू-सायनाचा ‘जलवा’

combo
नुकतेच लॅकमे फॅशन वीकमध्ये भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी रॅम्पवॉक केला. पारंपारिक पध्दतीचे पिवळ्या रंगाचे कपडे सायना परिधान केले होते. तर, पांढऱ्या रंगाचा पाश्चिमात्य पेहराव पीव्ही सिंधूने केला होता.


वानी रघुपतीने डिझाईने केलेला पिवळ्या रंगाचे सुंदर असे कपडे सायना नेहवालने परिधान केले होते. सोबतच तिने गळ्यात नेकलेस देखील घातला होता. सायना नेहवालने स्वत: इंस्टाग्राम आणि ट्वीटरवर याचे फोटो पोस्ट करताना, लॅकमे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करण्याचा क्षण अविस्मरणीय होता, असे लिहिले.

सर्वांचे लक्ष वेधून घेताना पांढऱ्या रंगाचा आकर्षक पाश्चिमात्य ड्रेस परिधान पीव्ही सिंधूने केला होता. सोबत तिने पांढऱ्या आणि राखाडी रंगाचे बुट घातले होते. इंस्टाग्रामवर तिच्या या लुकला पसंती मिळत असून आतापर्यंत एक लाखाच्यावर चाहत्यांनी लाईक केले आहे.

Leave a Comment