आयसीसीवर शेन वार्नची आगपाखड

shane-warne
अॅन्टिग्वा – इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौ-या असून या दोन्ही उभय संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. वेस्ट इंडिजने अवघ्या ३ दिवसांत दुसरा सामना जिंकला. पण वेस्ट इंडिजचा कर्णधार होल्डरला षटकांची गती कमी राखल्याबद्दल आयसीसीने एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न आयसीसीच्या निर्णयावर चांगलाच भडकला आहे.


याबाबत शेन वॉर्नने एक ट्विट केले असून त्यात तो म्हणतो की, अवघ्या ३ दिवसांत कसोटी सामना संपला होता. जेसन होल्डरला निलंबित करणे हा किती विचित्र निर्णय आहे. तुमचा कॉमनसेन्स हा निर्णय घेताना कुठे गेला होता. वॉर्नने आपल्या ट्विटमध्ये वेस्ट इंडिज संघाचे अभिनंदन करताना लिहिले, वेस्ट इंडिज संघाचे मालिका विजयाबद्दल अभिनंदन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मजबूत वेस्ट इंडिजची गरज आहे. आशा करतो की ही फक्त सुरुवात आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज संघाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. बलाढ्य इंग्लंड संघाला वेस्ट इंडिजचने पहिल्या २ कसोटीत पराभूत करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

Leave a Comment