विकी कौशलच्या ‘उरी’ने मोडला प्रभासच्या ‘बाहुबली २’चा हा विक्रम

uri
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाला मिळत आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेला सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ही कारवाई उरीतील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती.

आतापर्यंत १८९.७६ कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला असून त्याचबरोबर या चित्रपटाने प्रभासच्या बाहुबली २ या बहुचर्चित चित्रपटाचा एक विक्रमही मोडीत काढला आहे. बाहुबलीने प्रदर्शनानंतर २३ आणि २४ व्या दिवशी ६.३५ आणि ७.८० कोटींची कमाई केली होती. तर उरीने २३ आणि २४ व्या दिवशी ६.५३ आणि ८.७१ कोटींची धमाकेदार कमाई करत बाहुबली २ चा विक्रम मोडला. केवळ ४५ कोटी एवढे या चित्रपटाचे बजेट होते. मात्र, चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच हा आकडा पार करत बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला. अशात आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment