विश्वभ्रमंतीसाठी या जोडप्याने केला चार महिन्याच्या चिमुकल्याचा अमानुष छळ

viral
कुआलालंपुर : रशियाच्या एका जोडप्याला मलेशियन पोलिसांनी सोमवारी अटक केली असून हे जोडपे त्यांच्या चार-महिन्याच्या बाळाला घेऊन रस्त्यावर वेगवेगळ्या करामती करत होते. हे करण्यामागचे कारण ऐकल्यानंतर पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. अशा करामती आपल्या चार महिन्याच्या बाळाकडून करवून घेऊन त्यातून जमा होणा-या पैशाच्या माध्यमातून या जोडप्याला विश्व भ्रमंती करायची होती.

(विशेष सुचना – हा व्हिडीओ मनविचलित करणारा असून तो तुमच्या जबाबदारी पाहा.)
रविवारी या घटनेचा ९० सेकंदांचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक निळी चड्डी आणि पांढरा टी शर्ट घातलेला माणूस आपल्या पायामधून एका छोट्या बाळाला झुलविताना तसेच खांदयावर उचलून फेकताना दिसत आहे. तसेच एक महिला जी त्याची बायको असल्याचे वाटते आहे. ती आपल्या हातात एक कार्ड घेऊन उभी आहे आणि त्यावर लिहिले आहे. आम्हाला विश्वभ्रमंती करायची आहे. त्यांच्या करामती पाहणारे लोक त्यांना हा मूर्खपणा बंद करा असे व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, या जोडप्याला आम्ही ताब्यात घेतले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आम्ही करत असल्याचे कुआलालंपुर पोलीस मुख्य मझलान लझीम यांनी सांगितले आहे.

Leave a Comment