‘गली बॉय’चा पहिला डायलॉग प्रोमो रिलीज

gully-boy
नुकताच अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट अभिनीत ‘गली बॉय’ चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांनी या डायलॉग प्रोमोला चांगलीच पसंती दर्शवली आहे. रणवीर आणि आलिया यांच्या नात्यातील तिखट-गोड संभाषण या प्रोमोमध्ये चाहत्यांना अनुभवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांकडून विशेष दाद मिळाली. ‘गली बॉय’ हा चित्रपट स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे. रॅपरचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. रणवीर चित्रपटात एका रॅपरच्या भूमिकेत दिसणार असून आलिया मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे.

चाहत्यांनी ‘अपना टाइम आएगा’ या गाण्याला चांगलेच डोक्यावर घेतले. या गाण्यामध्ये सुद्धा गरीब भागात राहणारे स्ट्रीट रॅपर कशा प्रकारे संघर्ष करतात आणि याच संघर्षाच्या बळावर उंच झेप घेण्याची इच्छा मनात कायम ठेवणाऱ्या रॅपरची गोष्ट या गाण्याच्या माध्यमातून दिसत आहे. रॅपर डिवाइन आणि रॅपर नैजी यांनी ‘मेरी गली में’ या गाण्याचे लेखन केले. या गाण्यामुळे सध्या हे दोघे चांगलेच चर्चेत आहेत. चाहत्यांच्या मनावर ‘मेरी गली में’ या गाण्याने सुद्धा राज्य केले आहे. ‘गली बॉय’ चित्रपट 14 फेब्रुवारीला चित्रपटागृहात दाखल होणार आहे.

Leave a Comment