
बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर त्याच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. दबंग सीरिजमधला तिसरा चित्रपट आता लवकरच येणार आहे. प्रत्येक चित्रपटाप्रमाणे या चित्रपटात देखील एक आयटम नंबर असणार पण मलायका अरोरा दिसणार नाही.
मलायका अरोरा ‘दबंग 3’मधून सलमान खानमुळे गंत्छती
चित्रपटातील आयटम सॉन्गमधून मलायका अरोराचे नाव निर्माते अरबाज खान आणि सलमान खान यांनीच हटवले आहे. हे आयटम सॉन्ग तिच्याऐवजी आता करीना कपूर करणार आहे. करीना दबंगच्या सिक्वेलमध्ये ‘फेव्हिकॉल से’ या आयटम सॉन्गमध्ये दिसली होती. त्यामुळे अरबाज आणि सलमानने या दबंग 3 मध्ये करीनाचीच निवड केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
