गुगलने हटवले डाटा चोरी करणारे २९ ब्युटी कॅमेरा अॅप

google1
सॅन फ्रान्सिस्को : २९ ब्युटी कॅमेरा अॅप गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून डिलीट केले असून पोर्नोग्राफिक कंटेन्ट या अॅपमधून शेअर केला जात होता. तसेच हा डाटा युजर्सला मुख्यत: भारतात फिशिंग वेबसाईटसद्वारे डाटा चोरण्यासाठी फॉरवर्ड केला जात होता. याबाबत अमेरिकन सायबर सिक्युरिटी फर्म ‘ट्रेन्ड मायक्रो’च्या माहितीनुसार, लाखो वेळा यातील काही अॅप डाऊनलोड करण्यात आले होते. हे अॅप सर्वाधिक वेळा आशियामध्ये डाऊनलोड करण्यात आले होते. यावर गूगलने कठोर कारवाई करत हे अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून डीलिट केले आहेत.

ट्रेन्ड मायक्रो’च्या रिपोर्टनुसार, आपला डाटा चोरी होत आहे याची हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सना भनकही नव्हती. जेव्हा आपला डिव्हाईस युझर्स अनलॉक करतील तेव्हा अॅप संपूर्ण स्क्रीनवर वेगवेगळ्या जाहिराती दाखवेल. यातील काही जाहिराती फसवणूक करणारे किंवा पोर्नोग्राफी असू शकतात. जे युझर्सला ब्राऊजरच्या माध्यमातून पॉप-अप करतील.

आम्हाला विश्लेषणा दरम्यान एक पेड ऑनलाईन पोर्नोग्राफी प्लेअर आढळला. पॉप-अपवर क्लिक केल्यानंतर जो डाऊनलोड झाला होता. यातील कोणत्याही अॅपकडून जाहिरातींच्या मागे चुकीचा कंटेन्ट असल्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे, युझर्सना या जाहिराती कुठून आल्या हे शोधून काढणेही अवघड झाले होते.

Leave a Comment