वयाच्या चाळीशीनंतर महिला अधिक हॉट होतात – विद्या बालन

vidya-balan
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता ती तिने केलेल्या एक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने वयाच्या चाळीशीनंतर महिला अधिक हॉट होत असल्याचे म्हटले आहे.

एका मॅगझीनला आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीत महिलांविषयी अनेक गोष्टींचा विद्याने खुलासा केला. वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होतो. त्या आधीपेक्षा हॉट होतात. महिला या वयानंतर अधिक काळजी करत नाही आणि जीवन जास्त खास पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत असतात. महिला चाळीशीच्याआधी काही प्रमाणात लाजऱ्या असतात. आपण जेव्हा इतरांचा विचार न करता आपल्या पद्धतीने जीवन जगत असतो तेव्हा आपण जीवनाचा अधिक आनंद घेत असल्याचे तिने म्हटले आहे.

माझ्या आयुष्यात मी मागे जात आहे. गंभीर होण्याचा प्रयत्न मी करते परंतु मी सगळे काही विसरून जीवनाचा आनंद घेत आहे. जेव्हा मी २० वर्षांची होती तेव्हा माझ्या स्वप्नांविषयी चिंतीत होती, ३०व्या वर्षी मी स्वत:ला ओळखले आणि आता चाळीशीनंतर मी जीवनावर माझ्या जीवनावर प्रेम करायला लागली असल्याचे तिने म्हटले आहे.

Leave a Comment