वन नाईट स्टँडसाठी ‘या’ अभिनेत्रीला 1 कोटीची ऑफर

sakshi-chaudhary
एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तेलुगू जेम्स बॉन्ड आणि ऑक्सिजन यासारख्या चित्रपटात ही अभिनेत्री झळकली होती. या अभिनेत्रीचे नाव साक्षी चौधरी असे आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केल्यानंतर, इंटरनेट युजर्सनी नालायकपणाचा कळस गाठला. वन नाईट स्टँडसाठी या अभिनेत्रीला 1 कोटीची ऑफर देण्यात आली.

आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर मॉडेल्स, अभिनेत्री शेअर करतात. त्याखाली येणाऱ्या कमेंटही तशाच असतात. अशाच घाणेरड्या कमेंट्सला अभिनेत्री साक्षी चौधरीलाही सामोरे जावे लागले. साक्षी चौधरीचा आगामी ‘मेगनेट’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्यामुळे साक्षी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यादरम्यानच सोशल मीडियावर साक्षीचा एक फोटो व्हायरल होत आहे. साक्षीला त्यानंतर अत्यंत लांच्छनास्पद कमेंट्सना सामोरे जावे लागत आहे. एका युजर्सने तर एका रात्रीसाठी 1 कोटी देण्याची ऑफरच दिली.

ट्वीटच्या माध्यमातून अशा घाणेरड्या कमेंट्सना साक्षीनेही सडेतोड उत्तर दिले. मला एका रात्रीसाठी एक कोटीची ऑफर दिली जाते, मूर्ख आहेत ते, मी तशी नाही, या लोकांची मानसिकता दिसून येते, असे साक्षीने म्हटले. साक्षीने ‘पोटूगाडू’ चित्रपटातून पदार्पण केले होते. साक्षीने तामीळ चित्रपट रुस्तममेही काम केले होते.

Leave a Comment