चित्तथरारक ‘सावट’चा टिझर रिलीज

saavat
मागील सात वर्षात एका गावात सात आत्महत्या होतात आणि श्रावण महिन्यातच या सगळ्या आत्महत्या होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिले आहे. पण कोणाला?.. यावरच बेतलेल्या ‘सावट’ चित्रपटाचा चित्तथरारक टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात झाला आहे. त्यातून स्पष्ट असे होते की, हा थरारक चित्रपट पाहताना एक प्रकाराची रक्त गोठवणारी भीती नसानसातून सळसळणार आहे.

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटाचा पहिला टिझर पाहून कोणाच्याही मनात प्रश्नांचे डोंगर उभे राहतील. टिझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो. याविषयी ‘सावट’ची निर्माती हितेशा देशपांडे म्हणते, मराठीत एक म्हण आहे, दिसते तसे नसते म्हणून जग फसते. तसेच काहीसे ‘सावट’ चित्रपटाबाबतही आहे. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे सावट ब-याचदा माणसाच्या मनावर असते. आणि मग तो उगीच घाबरून श्रध्दा-अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडतो. “

दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणतात, हा चित्रपट थरारनाट्य आहे. एका गावात काही समजुती आणि गैरसमजुतींचे ‘सावट’ लोकांच्या मनावर असताना, चित्रपटात आत्महत्यांचे सत्र चालू होते. चित्रपट गुढकथेवर आधारित आहे. यातील प्रत्येक पात्र तुम्हाला खिळवून ठेवतील, असा मला विश्वास आहे. निरक्ष फिल्मच्या सहयोगाने लेटरल वर्क्स प्रा.लि.प्रस्तुत, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटात स्मिता तांबे , मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. २२ मार्च २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Leave a Comment