खाकी वर्दीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आयुष्मान खुराणा

ayushman-khurrana
२०१८ हे वर्ष बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणासाठी खूप खास ठरले. त्याचे २ चित्रपट यावर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’ या दोन्हीही चित्रपटाला दमदार यश मिळाले. आयुष्मान आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘बरेली की बर्फी’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’ यासारख्या चित्रपटातून आयुष्मानने आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. तो आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. याबाबत एका आघाडीच्या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूर येथे या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

आयुष्मान याबाबत बोलताना म्हणाला की, याबाबत अद्याप अनेक गोष्टींची चर्चा करणे बाकी आहे. आणखी बरेचसे निर्णय घ्यावे लागणार आहेत. हे निर्णय जेव्हाही घेण्यात येतील तेव्हाच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. आयुष्मानला पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत.

Leave a Comment