सरफराजच्या घर वापसीवर पीसीबीवर भडकला वसीम अक्रम

wasmi-akram
लाहोर – पीसीबीने सरफराज अहमद याची घरवापसी केल्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम चांगलाचा भडकला आहे. वसीमच्या मते, आफ्रिकेविरुद्ध होणारा शेवटचा टी-२० सामना सरफराज खेळू शकला असता. आयसीसीने त्याच्यावर आफ्रिकेचा खेळाडू एंडिले फेलुकवायोवर वर्णभेदी टीका केल्याबद्दल चार सामन्यांची बंदी घातली असल्यामुळे सरफराज मायदेशी परतला आहे.

पुढे बोलताना वसीम म्हणाला की, सरफराजने अशी टीका करणे योग्य नव्हते. मायदेशात त्याला परत बोलवणे चुकीचे आहे. शेवटचा टी-२० सामना तो खेळू शकला असता. विश्वचषकापूर्वी कर्णधार बदलण्याची गरज नव्हती. आम्हाला दीर्घकाळ संघासाठी कर्णधारपद सांभाळणारा खेळाडू पाहिजे. संघाचे नेतृत्व शोएब मलिक करत आहे. तो चांगले काम करत आहे. पण तो विश्वचषकानंतर निवृत्त होईल.

Leave a Comment