अंबानी परिवारामध्ये आणखी एका विवाहसोहळ्याची तयारी सुरु

aakash-ambani
नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिचा विवाह गत वर्षी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या प्रस्थांनी हजरी लावली होती. या विवाहसोहळ्याचा उत्साह आता कुठे संपतो ना संपतो तोच अंबानी कुटुंबामध्ये आणखी एका विवाहसोहळ्याची तयारी सुरु झाली असल्याचे वृत्त आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचे पुत्र आकाशचा साखरपुडा काही महिने आधीच श्लोका मेहता हिच्याशी मोठ्या थाटात पार पडला होता. श्लोका मेहता ही प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या असून, वडिलांच्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.
aakash-ambani1
श्लोकाने आपल्या विवाहासाठी खरेदीला सुरुवात केली असून, एक प्रतिष्ठित डिझायनर स्टोरमध्ये श्लोका खरेदी करीत असतानाचा व्हीडोयो सोशल मिडीयावर नुकताच व्हायरल झाला आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी आकाश आणि श्लोकाच्या विवाहाची तयारी सुरु झाली असल्याचा कयास लावला आहे. आकाश आणि श्लोका यांचा विवाह यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात होण्याचे निश्चित झाले असून, या लग्नसोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. श्लोका मेहता आणि नीता अंबानी यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या विवाहासाठी हजेरी लावली होती. त्यावेळची त्यांची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.

Leave a Comment