‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज

sonam-kapoor
शैली चोप्राद्वारा दिग्दर्शित आणि अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव अभिनीत ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेम, कुटुंब आणि वडिलांच्या अपेक्षा या सर्वांच्या ओझ्याखाली अडकलेल्या सोनमची होणारी घुसमट पाहायला मिळत आहे.

यातून लग्नासाठी सोनमवर वारंवार दबाव टाकणारे अनिल कपूर आणि या लग्नासाठी तयार नसलेली सोनम यांची कथा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पण, या लग्नाला सोनम नेमके कोणत्या कारणामुळे नकार देत असते, हे पहिल्या ट्रेलरप्रमाणे यातही गुपितच ठेवले गेले असल्याने याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे.

चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्राची बहिण शैली चोप्रा यांनी केले आहे.

Leave a Comment