व्हिडिओ व्हायरल; कृती-आर्यनचा अक्षय कुमारच्या गाण्यावर धमाल डान्स

karitk-aaryan
कार्तिक आर्यन आणि कृती सेनन ही जोडी आगामी ‘लुका छुपी’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने धमाल उडवलेली असतानाच अक्षय कुमारने दोघांच्या ‘लुका छुपी’ला साथ दिली आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कृती यांच्या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्यांच्या लग्नाची मनोरंजक कथा दाखवण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अक्षय कुमार देखील यात धमाल करताना दिसत आहे.


अक्षय कुमारच्या ‘अफलातून’ चित्रपटातील ‘पोस्टर छपवा दो’ या गाण्याचा वापर ‘लुका छुपी’ या चित्रपटात करण्यात आला आहे. १९९७ मध्ये ‘अफलातून’ हा चित्रपट रिलीज झाला होता. अक्षय आणि उर्मिला मांतोडकरची यात प्रमुख भूमिका होती, कृती आणि कार्तिक या व्हिडिओमध्ये एका गाण्यावर डान्स करताना दिसतात. अक्षय कुमार त्यांच्यात सहभागी होतो आणि तिघेही धमाल करतात.