आता लोकायुक्तांच्या कक्षेत येणार मुख्यमंत्री, राज्य सरकारने मान्य केली अण्णा हजारेंची मागणी

anna-hazare
मुंबई – राज्य सरकारने आज मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्य सरकारने यासंदर्भातील लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला मंजुरी दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी केली होती. अखेर राज्य सरकारने आज ही मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत येणार असून, मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत.

Leave a Comment