‘या’ सेलिब्रिटी पत्नी त्यांंच्या पतींपेक्षा इन्स्टाग्रामवर आहेत अधिक लोकप्रिय

insta
बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींनी इन्स्टाग्रामवरील त्यांना लाभलेल्या लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्या नवरेमंडळींना मागे टाकले आहे. या सेलिब्रिटी पत्नी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करीत असलेल्या मेसेजेस आणि छायाचित्रांबद्दल त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्कंठा असून, या सेलिब्रिटी पत्नींच्या पोस्ट्स आणि छायाचित्रे झपाट्याने व्हायरल होत असतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन ही पती-पत्नीची जोडी बॉलीवूडमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. किंबहुना पती-पत्नींमधील नातेसंबंध कसे असावेत याचे आदर्श उदाहरण म्हणून या जोडीचे नाव नेहमी घेतले जात असते. ‘अभि-अॅश’ नावाने लोकप्रिय असलेली ही जोडी नेहमीच आपली छायाचित्रे सोशल मिडीयावर पोस्ट करीत असते. मात्र माजी विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्याचे इन्स्टाग्रामवर अभिषेकपेक्षा जास्त ‘फॉलोअर्स’ असून, ऐश्वर्याचे इन्स्टाग्रामवर ६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर अभिषेकचे ४.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

Happy New Year. 🥂

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on


नुकतेच विवाहबद्ध झालेले स्टार कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन यांचा विवाह मोठा उत्सुकतेचा विषय ठरला होता. किंबहुना २०१८ सालामधील हा सर्वात चर्चिला गेलेला विवाहसोहळा होता. या जोडीला अफाट लोकप्रियता लाभली असली, तरी इन्स्टाग्राम वर दीपिककाचे फॉलोअर्स रणवीरच्या फॉलोअर्सच्या मानाने खूपच अधिक आहेत. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे ३१.६ मिलियन फॉलोअर्स असून, रणवीरचे १९.५ फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


२०१८ साली आणखी एक बहुचर्चित विवाहसोहळा ठरला अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप गायक निक जोनास यांचा. ‘निक-यांका’ म्हणून ओळखले जाणारे हे कपल देखील इन्स्टाग्रामवर अतिशय लोकप्रिय आहे. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ३५.१ मिलियन फॉलोअर्स असून, अमेरिकन ‘पॉप सेन्सेशन’ निक जोनास याचे २०.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

Mr. & Mrs. Jonas

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता चित्रपटांमध्ये दिसत नसली, तरी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना दर्शन देत असते. शिल्पाने आता फिटनेस क्षेत्राकडे मोर्चा वळविला असून, अनेक फिटनेस डीव्हीडी, हेल्दी कुकिंग शो, यांच्या माध्यमातून तिची लोकप्रियता टिकून राहिली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा यशस्वी व्यावसायिक आहे. शिल्पाचे इन्स्टाग्रामवर ९.२ मिलियन फॉलोअर्स असून, राज कुंद्रा यांचे ५४६ हजार फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

Turkey Ready.. Christmas lunch is always a grand affair -our London home . Turkey with the trimmings ( chestnuts, parsnips,purplecabbage, mash,carrots and Yorkshire puds) and 8 desserts at atleast 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🙀With family and friends over to feast..it’s pandemonium in the kitchen with everyone trying to make a dish or chip in..Keeping up the with tradition the Turkey Roast is my dept , and this time it was a 10 kg one😅😅Marinated it the previous night with fresh sage, thyme and rosemary butter and put it in the oven at 4 am to be ready in time ( 7hrs in the oven)😅😅All well worth the effort when it turns out right.. crispy from the out and moist inside ..Happy faces ..Job done ! @rajkundra9 Well done the molten lava cake was yummmm 😬🤗 #familytime #gratitude #christmaslunch #foodcoma #londondiaries #festive

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on


इन्स्टाग्रामवर पतीपेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटी पत्नींमध्ये अभिनेत्री बिपाशा बासूचा ही समावेश आहे. बिपाशाचे इन्स्टाग्रामवर ६.३ फॉलोअर्सअसून, तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोव्हर याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment