अँटिग्वा सरकार मेहुल चोक्सीला भारतात पाठवणार नाही

mehul-choksi
नवी दिल्ली – अँटिग्वा सरकारने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) चुना लावून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा दावा शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून करण्यात आला होता की, भारताकडून मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी बोईंग विमान पाठवण्यात आले आहे. अँटिग्वा सरकारने या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण दिले आहे.

अँटिग्वा आणि किट्स या देशांमध्ये मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता हे दोघेही अनुक्रमे शरण गेले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, कॅरेबिअन बेटांवर सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी जाणार होते. भारताचे हे अधिकारी त्यासाठी एक बोईंग विमान घेऊन जाणार होते.

पण, अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले की, आता चोक्सी अँटिग्वाचा नागरिक आहे आणि येथील सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की, आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी भारत सरकारचे कोणी अधिकारी आले असल्याची आपल्याला माहिती आपल्याला नाही.

Leave a Comment