
काही दिवसांपूर्वी हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे गायिका नेहा कक्कर डिप्रेशनमध्ये होती. पण या सर्वातून बाहेर येत आता नेहा पुन्हा एकदा पुढच्या वळणावर निघाली आहे. नेहाकडे सध्या लिटील चॅम्पस या कार्यक्रमाच्या परीक्षकाची जबाबदारी आहे. नेहाने याच शोमध्ये बोलताना आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.
रणबीर कपूरच्या प्रेमात नेहा कक्कर
नेहाने लाखो तरूणींच्या हृदयावर राज्य करणारा रणबीर कपूर माझाही आवडता अभिनेता असल्याचे म्हटले आहे. समोरच्या व्यक्ती पुढे आपल्या प्रेमाची कबुली द्यायला काही मुली घाबरतात आणि तसेच माझ्या बाबतीतही झाले. रणबीरसमोर मी कधीही याबद्दल बोलू शकले नाही, असेही नेहाने यावेळी म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपमुळे गायिका नेहा कक्कर चर्चेत आहे. या दोघांनीही काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण अलिकडेच त्यांच्या ब्रेकअपने चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अचानक एकेदिवशी इंडियन आयडल शोच्या सेटवर हिमांश कोहली नेहाला भेटायला आला.
