हे आहेत गतवर्षातील गुगलवर सर्वाधिक ‘सर्च’ केले गेलेले विवाहसोहळे

weddings
२०१८ हे वर्ष अनेक शानदार विवाहसोहळ्यांनी नटलेले होते. भारतातील प्रथितयश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कन्येच्या विवाहसोहोळ्यापासून ब्रिटीश राजवंशाचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या विवाहसोहोळ्यापर्यंत अनेक दिमाखदार विवाहसोहळे गेल्या वर्षभरामध्ये पार पडले आहेत. या सर्व विवाहसोहळ्यांच्या विषयीची उत्कंठा, उत्साह जगभरामध्ये पहावयास मिळाला असून, गुगलवर हे विवाहसोहळे सर्वाधिक ‘सर्च’ केले गेले आहेत.
weddings2
गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या विवाहसोहळ्यांच्या यादीमध्ये प्रथम स्थान ब्रिटन राजघराण्यामध्ये पार पडलेल्या प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या विवाहसोहळ्याने पटकाविले आहे. हा विवाह २०१८ साली पार पडला असला, तरी या सोहळ्याच्या काही महिने आधीपासूनच जगभरामध्ये सर्वत्र याविषयी उत्कंठा लागून राहिली होती. या शाही विवाहानंतर गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक, गीतकार निक जोनास यांचा विवाहसोहळा. हा विवाहसोहळा दोन विधींच्या नुसार पार पडला असून, जोधपुर येथील उमेद भवन पॅलेस येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
weddings3
यानंतर आहे दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा. हा भव्य सोहळा इटलीतील लेक कोमो या ठीकाणी पार पडला होता. ब्रिटीश शाही परिवारातील आणखी एक सदस्य, राणी एलिझाबेथचची नात प्रिन्सेस युजीनी आणि ब्रिटीश व्यावसायिक जेम्स ब्रूकबँक यांच्याही विवाहसोहळ्याबाबत लोकांमध्ये खूपच उत्सुकता पहावयास मिळाली.
weddings1
या सर्व विवाहसोहळ्यांची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून, या विवाहांचा शाही थाट आणि अतिशय सुंदर दिसणारे वर-वधू पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.

Leave a Comment