‘गली बॉय’चे गरीब श्रीमंतीतील भयाण ‘दरी’ दाखविणारे नवे गाणे रिलीज

gully-boy
‘सिम्बा’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा गली बॉय चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. २ रॅप गाणीही यापूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. गरीब श्रीमंतीतील भयाण ‘दरी’ या गाण्यात दाखविण्यात आली आहे.

या गाण्याचे बोल ‘कोई मुझको यूं बताये, क्यों ये दूरी और मजबूरी’, असे असून हे गाणे रणवीर सिंहनेच गायले आहे. या गाण्याला ऋिषी रिचने संगीत दिले आहे. तर, याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. झोपडपट्टी, फुटपाथ आणि गरीब परिस्थितीत राहणाऱ्या लोकांचे वास्तव या गाण्यात दाखविण्यात आले आहे. या लोकांच्या डोळ्यात अनेक स्वप्न आहेत. मात्र, परिस्थितीसमोर ते कसे हतबल आहेत, हे गाण्यात पाहायला मिळते. रणवीर त्यांचा आवाज बनलेला या गाण्यात दिसून येतो.

Leave a Comment