काँग्रेस-भाजप आमदारांच्या खुरापतींना वैतागले कुमारस्वामी

kumaraswamy
बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी काँग्रेस आणि भाजप आमदारांच्या वादामुळे वैतागलेले दिसत असल्यामुळे शेवटी कंटाळून आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ, असे त्यांना म्हणावे लागले. त्यांनी ही उद्विग्न प्रतिक्रिया ‘ऑपरेशन लोटस’ या प्रकरणावर पत्रकारांच्या प्रश्नाला संतापून दिली.

सध्या कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता माजलेली आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा ऑपरेशन लोटसच्या नावावर काँग्रेसचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तसे करून मुख्यमंत्रीपद हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. कर्नाटक काँग्रेस प्रमुख सिद्धरमैय्या त्यांच्यावर ताबा ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. पण चक्क सिद्धरमैय्याच आमचे मुख्यमंत्री आहेत, असे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी म्हटले होते. त्यानंतर तेथे राजकीय वातावरण तापले आहे.

कुमारस्वामी कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री बनले आहेत. काँग्रेस आमदारांच्या या वक्तव्यामुळे कुमारस्वामी संतापलेले दिसतात. काँग्रेस आमदारांची ईच्छा सिद्धरमैय्या यांना मुख्यमंत्री करण्याची असेल तर मी पदत्याग करतो, चक्क अशा शब्दात त्यांनी यावर प्रतिक्रियी दिली. काँग्रेसने आपल्या आमदारावर नियंत्रण ठेवावे. त्यांना मी सांभाळणे माझे काम नाही, असेही ते यावर म्हणाले.

Leave a Comment