‘आनंदी गोपाळ’मधील दुसरे गाणे तुमच्या भेटीला

anandi-gopal
महाराष्ट्रातच नाही, तर जगभराला भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे नाव परिचीत असून त्यांनी अनेक कठिण प्रसंगाचा सामना करत, समाजाचा रोष पत्करत विदेशात जाऊन शिक्षण घेतले. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा सन्मान मिळविला. रुपेरी पडद्यावर त्यांचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडणार आहे. त्यांचा हाच प्रवास उलगडणारे एक गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

आनंदीबाईंची शिक्षणासाठी असलेली जिद्द या चित्रपटातील ‘वाटा वाटा गं’ या गाण्यातून पाहायला मिळते. हे गाणे प्रियंका बर्वे यांनी गायले आहे. तर, ह्रषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीत दिले आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ही या चित्रपटात आनंदीबाई यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील ‘रंग माळियेला’ हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. प्रेक्षकांनी या गाण्यालाही चांगला प्रतिसाद दिला. झी स्टुडिओ प्रस्तुत, नम: पिक्चर्स आणि फ्रेश लाईम फिल्मस यांच्यातर्फे हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment