ठाकरे’ चित्रपटाची तीन दिवसात एवढी कमाई

thackrey
२५ जानेवारीला चित्रपटगृहात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत शिवसैनीकांनी केले. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी ६ कोटींची दमदार कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमविण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

२० कोटीच्या आसपास मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांवर तयार करण्यात आलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाचे बजेट होते. या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धूरा अभिजीत पानसे यांनी सांभाळली आहे. पहिल्याच दिवशी तिकीट बारीवर ‘ठाकरे’ हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट साधारण ३ कोटी कमावेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पहिल्याच दिवशी दुपटीने कमवत हा चित्रपटाने ६ कोटींची मजल मारली आहे. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने १० कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर २६ कोटींचा गल्ला जमवला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास ‘ठाकरे’ या चित्रपटातून उलगडला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांच्या भुमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर, मीनाताईंच्या भुमिकेत अमृता रावही यशस्वी ठरली आहे. दोघांच्याही अभिनयाचे कौतुक होत आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment